Rajendra Patil.
सोमवार, 7 नवंबर 2016
★मुठभर ब्राम्हणांनी स्वजाती रक्षणासाठी , हितासाठी धर्माच्यानावावर चालवली जाणारी संघटना म्हणजेच संघ !! ★---------------------- मुळातच लोकसंख्येने कमी असलेले , त्यामुळे सत्तासंघर्षात कुठलेही स्थान मिळवण्या इतपत संख्याबळ नसल्याने फक्त षडयंत्री बुध्दीच्या जोरावर आपल्या समाजास सत्तेच्या केंद्रभागी ठेवणे व उध्दीष्ठ साध्य करणे हेच खरे संघाचे सिध्दांतवादी धोरण. देशात ज्या प्रमाणे मराठा ,राजपूत , जाट , यादव ,गुजर , रेड्डी , अशा जातींचे राजकारणात व देशात राजकिय प्राबल्य आहे.त्यात तिन टक्के असलेल्या समाजाला कुठे स्थान. पारंपारीक राजेरजवाड्या पासून त्यांच्या काळापासून धर्मसत्तेवर अधिराज्य गाजवून क्षत्रीयांना आपल्या तलावर नाचवणारे हे पंडीत. अनादीकाला पासून धर्मसत्तेच्या नावावर जातीय वर्णव्यवस्थेवरून स्वतःला श्रेष्ठ व इतरांना हिणवून आपले वर्चस्व अबाधित राखण्यात यशस्वी झालेत. ★देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागलेत, देश स्वातंत्र्य होण्याच्या मार्गावर आला,त्यावेळी मात्र यांनी आपले अस्तीत्व वेगळे राखण्या करीता " हिंदू महासभा " नावाने संघटन स्थापन केले.येथे ही त्यांचे राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकूश पाहीजे म्हणजेच ब्राम्हण समाजाचे अस्तीत्व टिकेल. राजाश्रयाच्या जोरावर धर्मसत्ता अबाधित ठेवायची अन् धर्मसत्तेने राजसत्तेवर अंकूश ठेऊन आपसे उच्चवर्णीय अस्तीत्व अबाधित ठेवायचा पाठ इंग्रजांच्या आश्रयाला जाऊन कायम ठेवला.म्हणूनच स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांना साथ देत लढ्यात कुठलेही योगदान न देता अपेक्षा ठेवली की इंग्रज जाता जाता स्वातंत्र्याची धुरा आपल्यावर सोपतील व आपणच या देशाचे राज्यकर्ते होऊ.परंतू गांधी व नेहरूंच्या योगदानामुळे व हिंदूमहासभा हि धर्मवादी असल्याने भारताची स्वातंत्र्याची कास इंग्रजांनी नेहरूंकडे सोपवली..हेच यांचे खरे दुख कारण घाव वर्मी लागला होता. राजे राजवाडे ,संस्थाने खालसा झालीत, भारत निधर्मीराष्ट्र म्हणून उदयास आले.तेंव्हा लोकांची व राज्यकर्त्यांची भावना धर्मापेक्षा विकासाभीमुख जास्त राहीली. ★ हिंदूमहासभाने जनसंघ स्थापला व राजकारणात पाऊल टाकले.परंतू लोक धर्मापेक्षा नेहरू गांधींच्या प्रभावाने जास्त भारावलेले होते. त्यामुळे धर्मसत्तेला राजाश्रय मिळत नव्हता. हिंदूमहासभा मग राष्टीय स्वयंसेवक संघात रूपांतरीत झाली. ★ हजारो वर्षाचा धर्माचा पगडा आपल्यावर असल्याने धर्मसत्तेच्या ठेकेदारांनी याचाच लाभ घेत जनतेला धर्माच्या नावावर वेठीस धरत आपले बस्तान बसवले. ★ धर्म हाच राष्ट्रवाद , धर्म हेच राष्ट्रप्रेम ★ संघाच्या शाखा काढणे , छोटी मोठी कामे करणे व त्याला देशप्रेमाचां संदर्भ जोडून सरकार देशविरोधी आहे असे जनतेत भासवणे , खोटा इतिहास निर्माण करून जनतेला भ्रमित करणे . जनतेत पोहचण्यासाठी शाखांमध्ये बहूजन समाजाला केंद्रस्थानी ठेऊन त्यांना संघात समिल करणे.संघाचा झापडबंद खोट्या इतीहासाने प्रेरीत करणे.बहूजनांचे ब्रेनवॉश करण्याचे काम संघीय ब्राम्हण तनमनाने पार पाडीत असतात. अर्धा आपुरा कमी शिक्षीत बहूजन समाज चिकीत्सक नसल्याने यांच्या बौध्दीक कुटनितीला बळी पडत संघाच्या आहारी जाऊन स्वतःला बुध्दीवादी व बहूजनांमध्ये श्रेष्ठ समजू लागला.मग बहूजनांमध्येही काही प्रमाणात बुध्दीवादी व श्रेष्ठ समजण्यासाठी संघाच्या पठडीत जाण्याची स्पर्धाच सुरू झाली. संघीय ब्राम्हण्यवाद्यांना हेच हवे होंते.डोके आपले व धड बहूजनांचे.ब्रेनवॉश झालेले डोके आपल्याच समाजाला हिणवू लागले , संघीय विचारधारेने समाजा विरोधात मनुवादी व धार्मीक अंधश्रध्देला खतपाणी घालू लागलेत व आग्रही होऊ लागलेत.कट्टर धर्मवाद जोपासू लागलेत. आपल्या बरोबर इतरानाही भरकटवू लागलेत.त्यांना बरोबर घेऊन इतर धर्मीयांबद्दल गरळ ओकू लागलेत.जातीय हिंसा ,दंगली घडवू लागलेत.त्यातून धर्म व धार्मीकवाद वाढत जाऊन संघाच्या स्वयंसेवकात भरावरभर पडू लागली.त्यालाच मग देशप्रेमाचे नाव देऊन उन्माद वाढू लागला. नेमके संघाला हेच हवे होते त्यांच्या मुठभर ब्राम्हण्यवाद्यांकडून सत्ता मार्ग मिळणे अशक्यप्राय असल्याने जोपर्यंत बहूजन धार्मिकवाद डोक्यात घालत नाही व त्यातून कट्टरतावादी होत नाही तो पर्यंत संघ सत्तेपर्यंत पोहचू शकत नाही.एकदा का धार्मीकवाद बहूजनांच्या डोक्यात गेला की मग डोके भडकवायला वेळ लागणार नाही.डोके भडकले की इतर धर्मीयां विरूध्द तर सोडा स्वधर्मियांबद्दलही बहूजन संघी स्वतःच्या समाजा बरोबरही दोन हात करतील.आपले इप्सीत साध्य होईल. ★मुठभर संघीय ब्राम्हण जे साध्य करू शकणार नाहीत तेच बहूजनांच्या जोरावर साध्य करायचे आणी सत्ता उपभोगायची ती ही स्वजातीच्या कल्याणासाठीच. सत्तेत संखेने बहूजन व विचारांनी फक्त ब्राम्हण.सत्तेत ब्राम्हण आणी त्यांच्या संरक्षणासाठी मात्र बहूजन. ★ संघाच्या प्रमुखपदी कुठल्याही बहूजनाला आजपर्यंत स्थान नाही किंवा त्यांच्या बौध्दीक बैठकितही नाही. ब्राम्हणांनी किंवा त्यांच्या वंशावळीनी फक्त उपभोगायचे आणी बहूजनांनी फक्त खपायचे. तिनटक्के समाजाने षडयंत्री बुध्दीच्या जोरावर बहूसंख्यांकाना धर्माच्या नावावर वेठीस धरायचे आणी त्यातून सत्ता संपादित करायची.यालाच ब्राम्हण्यवाद मानायला हरकत नाही. ★ ब्राम्हण समाजातही अनेक असे आहेत की त्यांना हे संघीय ब्राम्हण्यवाद पटत नाही , ग्रामिण भागातील ब्राम्हणही या पासून थोडा तरी दुर आहे.परंतू उच्च संस्कृतीत वाढलेलेच जास्त जातियवाद जोपासतात हे मात्र खरेय.म्हणून ब्राम्हण समाजातही या बाबतीत मतभेद आहेत.ते मात्र संघींपासून लांब राहणेच पसंद करतात.
सदस्यता लें
टिप्पणियाँ (Atom)